Thursday 24 September 2015

संघटन शक्तीचा विजय -- गणेश रोकडे

मित्रांनो,
         जुनि पेंशन च्या मागणीसाठी बऱ्याच भागातून छोटे छोटे उठाव सुरु झालेले आहेत.पण जोपर्यंत सर्व या उठावात सामिल होत नाही तोपर्यंत याचे उग्र स्वरुप शासनाच्या लक्षात येणार नाही.म्हणूनच हा आपला स्वतःचा लढ़ा समजा,पेटुन उठा,सहकाऱ्यांना सामिल करून घ्या.भविष्यातील आपल्यापुढे येणाऱ्या संकटांची जान ठेवा.मला आपोआप मिळेल या भ्रमात राहु नका.आज संघर्ष कराल तर भविष्य उज्जवल राहील नाहीतर......
           आपण सर्व सुजान आहोत,वेल क्वालिफाइड आहोत,त्यामुळे आपल्यावर झालेला अन्याय निश्चितच तुम्हाला कळेल.
     त्यामुळे कोणी मला बोलावेल याची वाट न पाहता मी यात काय योगदान देऊ शकतो ते बघा.मित्रहो आपल्या लढयाला निश्चित यश येईल.
     गणेश रोकडे
पेन्शन बचाव कृती समिती,पेठ

पेन्शन! पेन्शन! पेन्शन ।हक्क आमुचा पेन्शन

🔸पेन्शन ! पेन्शन ! पेन्शन! 🔸
         
          📝प्रविण गायकवाड
     प्राथ शिक्षक. जि प नाशिक

पेन्शन पेन्शन पेन्शन
हक्क आमचा पेन्शन.  ॥ धृ॥

नका घालू वाद
एकमेकांना देऊ साद
सरकारला करूया बाद
स्वतः च्या हक्कापायी कर्मचारी घेताहेत टेन्शन
पेन्शन पेन्शन पेन्शन
हक्क आमचा पेन्शन.   ॥१॥

चला रे चला सोबत चला
हक्कासंबंधी एकमेकांशी बोला
कुणी नाही कुणाचा चेला
कसंही करा काहीही करा
वाचवा आमचं भविष्याचं टेन्शन
पेन्शन पेन्शन पेन्शन
हक्क आमचा पेन्शन.   ॥२ ॥

सरकारी नोकर म्हणता सरल अमुचे जीवन
भविष्यात मात्र करावी लागेल वणवण
पेन्शन लागू करून करावे भविष्याचे रक्षण
पेन्शन पेन्शन पेन्शन
हक्क आमुचा पेन्शन.  ॥ ३॥

गाडी जीवनाची हाकतोय काम करत करत
असेच वयाची ५८ वर्षे जातील सरत सरत
वयवर्ष 58 नसे अमुचे शेवटचे स्टेशन
पेन्शन पेन्शन पेन्शन
हक्क आमुचा पेन्शन.    ॥४॥

गेली व्यतीत तीन वर्षे अन्यायी शिक्षणसेवकाची
तरिही पर्वा ना सरकारला आमुच्या भविष्याची
महागाई, भ्रष्टाचार,बदली,यातच संपणार पगाराचे रेशन
पेन्शन पेन्शन पेन्शन
हक्क आमुचा पेन्शन.  ॥५॥

धन्यवाद 🙏

🔶पेन्शन बचाव कृतीसमिती नाशिक🔷

Friday 18 September 2015

ऊन असो वा वारा ; पाऊस पडो वा गारा ::ज्ञानदेव नवसरे

नमस्कार मित्रांनो
ऊन असो वा वारा ।
पाऊस पडो वा गारा ।
पडू द्या जे पडायचे ते ।
घडू दे काय घडायचे आहे ते ।
आपण मात्र मागे हटायचे नाही ।
एकमेकांचे हात सोडायचे नाहीत ।
सर्वांनी मिळून अन्यायविरूद्ध लढायचे
आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य घडवायचे ।
           -- ज्ञानदेव नवसरे
धन्यवाद 🙏
Stay connected friends
👬👬👬🙏👬👬👭👭

मूकमोर्चा प्रेरणागीत :: संजयकुमार सुसलादे

   नमस्कार मित्रांनो,
 दि १८सप्टेंबर रोजी पेठ येथे खुप पाऊस पडत आहे अन आमच्या पेठच्या पेन्शन बचाव कृतीसमिती च्या शिष्टमंडळासह सर्वांनाच उद्याच्या नियोजित मूकमोर्चाची काळजी लागली होती.सर्वांचा उत्साह टिकवणे महत्त्वाचा आहे, सर्वांना प्रेरणा देणे गरजेचे आहे या भावनेतून आमच्या
 पेन्शन बचाव कृतीसमिती पेठ चे सचिव श्री संजयकुमार सुसलादे सरांनी मूकमोर्चासाठी आपल्या बांधवांसाठी एक प्रेरणागीत लिहिले अन पाहतो तर  काय सगळीकडे उत्साहाचे अन मूकमोर्चाच्या ऊर्जेचे वातावरण  तयार झाले.
क्षणातच  सगळ्यांनी ती पोस्ट आपापल्या व्हाॅटस् अॅप ग्रुपवर पाठवली.व्हाॅटस् अँपच्या ग्रुपवर सगळीकडे पेन्शन बचाव टेन्शन हटाव चे नारे घणाघात करू लागले.

   मूकमोर्चासाठी प्रेरणागीत
उद्या दूपारी पाऊस पडेल
तेव्हा एकच काम करायच,
हातातली काम टाकून देऊन
मूक मोर्चात भिजायच.

पावसाबरोबर पाऊस बनून
मोर्चात फक्त चालायचं,
आपल ऐक्य सर्वांच
जगाला दाखवायांच.

आपल असल वागणं बघुन
लोक आपल्याला हसतिल,
आपला स्क्रू ढीला झाला
अस सुध्दा म्हणतिल.

ज्याना हसायच त्याना हसू दे
काय म्हणायच ते म्हणू दे,
त्याच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांच त्याना कण्हु दे.

असल्या चिल्लर कावळ्याकड़े
आपण दुर्लक्ष करायच
उद्याचा पाऊस एकदाच येतो
म्हणुन मूक मोर्चात भिजायच
आणि

म्हणुन

उद्या दूपारी पाऊस पडेल
तेव्हा एकच काम करायच,
हातातली काम टाकून देऊन
मूक मोर्चात भिजायच.

---- संजयकुमार सुसलादे

🔶पेन्शन बचाव कृतीसमिती पेठ🔷
        ता - पेठ.   जि -  नाशिक.