Friday 18 September 2015

मूकमोर्चा प्रेरणागीत :: संजयकुमार सुसलादे

   नमस्कार मित्रांनो,
 दि १८सप्टेंबर रोजी पेठ येथे खुप पाऊस पडत आहे अन आमच्या पेठच्या पेन्शन बचाव कृतीसमिती च्या शिष्टमंडळासह सर्वांनाच उद्याच्या नियोजित मूकमोर्चाची काळजी लागली होती.सर्वांचा उत्साह टिकवणे महत्त्वाचा आहे, सर्वांना प्रेरणा देणे गरजेचे आहे या भावनेतून आमच्या
 पेन्शन बचाव कृतीसमिती पेठ चे सचिव श्री संजयकुमार सुसलादे सरांनी मूकमोर्चासाठी आपल्या बांधवांसाठी एक प्रेरणागीत लिहिले अन पाहतो तर  काय सगळीकडे उत्साहाचे अन मूकमोर्चाच्या ऊर्जेचे वातावरण  तयार झाले.
क्षणातच  सगळ्यांनी ती पोस्ट आपापल्या व्हाॅटस् अॅप ग्रुपवर पाठवली.व्हाॅटस् अँपच्या ग्रुपवर सगळीकडे पेन्शन बचाव टेन्शन हटाव चे नारे घणाघात करू लागले.

   मूकमोर्चासाठी प्रेरणागीत
उद्या दूपारी पाऊस पडेल
तेव्हा एकच काम करायच,
हातातली काम टाकून देऊन
मूक मोर्चात भिजायच.

पावसाबरोबर पाऊस बनून
मोर्चात फक्त चालायचं,
आपल ऐक्य सर्वांच
जगाला दाखवायांच.

आपल असल वागणं बघुन
लोक आपल्याला हसतिल,
आपला स्क्रू ढीला झाला
अस सुध्दा म्हणतिल.

ज्याना हसायच त्याना हसू दे
काय म्हणायच ते म्हणू दे,
त्याच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांच त्याना कण्हु दे.

असल्या चिल्लर कावळ्याकड़े
आपण दुर्लक्ष करायच
उद्याचा पाऊस एकदाच येतो
म्हणुन मूक मोर्चात भिजायच
आणि

म्हणुन

उद्या दूपारी पाऊस पडेल
तेव्हा एकच काम करायच,
हातातली काम टाकून देऊन
मूक मोर्चात भिजायच.

---- संजयकुमार सुसलादे

🔶पेन्शन बचाव कृतीसमिती पेठ🔷
        ता - पेठ.   जि -  नाशिक.

No comments:

Post a Comment