मूकमोर्चासाठी आवाहन - प्रविण गायकवाड ,अनिल सांगळे

🙏🙏नमस्कार🙏🙏
     पाऊस असो वा ऊन ।।।
   साथ द्या, मोर्चाला येऊन ।।।
पेन्शन बचाव समिती पेठ सर्वांना आवाहन करत आहे कि उद्या दि १९ नोव्हेंबर २०१५ ला आयोजित मूक मोर्चात आपण सर्वांनी सहभागी व्हावे आणि कर्मचाऱ्यांच्या समस्यानिवारणकामी आपले हात लावुन समाजसेवा करावी.
       मोर्चानंतर आपण सहविचार सभेतही हजेरी लावावी हि विनंती.
मित्रांनो उद्याचा मूक मोर्चा आंदोलनाची दिशा ठरवणारा आहे कृपया येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करत मोर्चात सहभागी व्हा......
          सुट्टी,प्रतिकुल वातावरण इतर कोणतेही कारण यांचा आपल्या  उपस्थितीवर परिणाम होऊ देवू नका
-प्रविण गायकवाड
-पेन्शन बचाव कृती समिती पेठ-



अनिल सांगळे
अध्यक्ष
पेन्शन बचाव कृतीसमिती पेठ

चला मित्रांनो आता आपण एकत्र आलो नाहीत तर लक्षात ठेवा आपण कधीच एकत्र येऊ शकत नाहीत.त्यामुळे हीच  वेळ आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन आपली एकजूट दाखवून देण्याची.त्यामुळे उद्या दुपारी १.०० वाजता उन,वारा,पाऊस कशाचीही तमा न बाळगता हजारोंच्या संख्येने पं.स.मैदान पेठ येथे एकत्र जमूयात.
       मित्रांनो तीन तास उशिरा घरी गेल्याने काहीच फरक पडणार नाही.
                  आपले विनित
            पेन्शन बचाव कृती समिती,पेठ
             ता.पेठ जि.नाशिक

No comments:

Post a Comment