पेन्शन बचाव कृतीसमिती पेठ सहविचार सभा

पेन्शन बचाव कृतीसमिती, पेठ सहविचार सभा

��पेन्शन बचाव कृतीसमिती पेठ सहविचार सभा��
ता पेठ ,जि नाशिक
दिनांक :: १२/०९/२०१५

��पेन्शन बचाव । टेंन्शन हटाव।��

                ��  ज्ञानदेव नवसरे��

सर्व डी सी पी एस धारक  कर्मचार्यांना नमस्कार��

    डी सी पी एस धारक शिक्षकांना जुन्या पेन्शनचा लाभ देण्यासाठी आणि एन पी एस बंद करण्यासाठी आज राज्यभरातील शिक्षक सरकारच्या निराशाजनक निर्णयाविरुद्ध एकवटत आहेत.
आज तालुका, जिल्हा स्तरावर शिक्षक एकत्र येऊन कृतीसमित्या स्थापन करून या लढ्याची पुढील दिशा निश्चित करत आहेत निश्चितच कौतुकास्पद आहे.
संपूर्ण राज्यातील, जिल्ह्यातील कर्मचारी
पेन्शन बचाव लढ्यासाठी एकमेकांना
आम्ही एकत्र येतोय ,तुम्ही कधी येताय?
असे एकमेकांना विचारत आहे.
 मला खात्री आहे हा पेन्शन बचाव चा लढा लवकरच हिमालयासारखा विशाल स्वरूप धारण करतो आहे.
डी सी पी एस धारक सर्व तालुक्यातील सर्व शिक्षक एकत्र आले  संघटित होऊन सहविचार सभा घेऊन अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना सर्वांना पेन्शन बचाव संबंधी निवेदने पोहचवली तर आपला निम्मा विजय निश्चित झाला असे समजायला वावगे ठरणार नाही कारण हा मुद्दा विधानसभेत पर्यायी लोकसभेत सुद्धा तीव्र होईल असे वाटतेय.
या लढ्याची नाशिक जिल्ह्यातील सुरूवातीची ठिणगी पेटलेली आहे
त्याला वणव्याचे स्वरूप देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील बर्याच  तालुक्यातील कार्यकारिणी गठित होऊन सहविचार सभाही संपन्न झाल्या आहेत , यावरून लक्षात येतेय की हा लढा सर्वसाधारण राहिला नसून व्यापक स्वरूप घेत आहे
आणखी तीव्रतेसाठी  सर्वांनी संघटित झाले पाहीजे.������
 आज. दिनांक १२/०९/२०१५ रोजी पेठ तालुक्यात पेठ नं २ शाळेत  पार पडलेल्या सहविचार सभेत सर्वांचा उत्साह ,ऊर्जा वाखण्याजोगी होती, सर्वांनी उत्कृष्ट प्रतिसाद नोंदवून पेन्शन बचावची उत्साहवर्धक,सकारात्मक आणि सहकार्यात्मक वातावरणात पेन्शन बचाव पेठची कार्यकारिणी गठित करण्यात आली .

��पेठ तालुका पेन्शन बचाव कृतिसमिती सहविचार सभेत खालील मुद्द्यांवर चर्चा झाली��

��जुनी पेन्शन बचावसाठी कर्मचारी संघटन वाढवणे.
��आपल्या बांधवांना जीवघेणी
डी सी पी एस/ एन पी एस  कशी अन्यायकारक आहे ती पटवून देणे .

��पेन्शन बचाव कृतीसमिती अध्यक्ष आणि शिक्षक याच्यातील दुवा म्हणून केंद्रसमन्वयक आणि चर्चा
��पेन्शन बचाव केंद्रसमन्वयक निवड आणि चर्चा
��सर्व केंद्रसमन्वयकांनी अध्यक्ष ,सचिवाची  निवड आणि अनुमोदन
��सर्वांनी मिळून इतर कार्यकारिणीतील पदे निश्चित करून जबाबदारी सांगितली तसेच सर्वांनी एकमेकांना  सहकार्य करण्याचे आवाहन केले.
�� उद्या दि.  १३/०९/२०१५ रोजी पेन्शन बचाव संबंधी पेठ  तालुक्याचे मा.आमदार  श्री झिरवाळ साहेबांना साहेबांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यासंबंधी चर्चा करण्यात आली.
�� बीडीओ साहेब तसेच तहसीलदार साहेब यांनाही निवेदन देण्यासंबंधी तसेच पुढील आठवड्यात पेठ तालुक्यात मुकमोर्चा काढण्यासंबंधीही नियोजन करण्यात आले.
��सभेतील सर्वच बांधव चर्चेत सहभागी होऊन सरकारच्या डी सी पी एस या जीवघेण्या निर्णयाचा खरपुस समाचार घेताना दिसली.

एकंदरीत या सहविचार सभेवरून असे लक्षात येतेय की कर्मचारी पेन्शनच्या अन्याय विरूद्ध लढा तीव्र करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

महाराष्ट्रातील सर्व पेन्शनग्रस्त कर्मचारी बांधवांना मी आवाहन करतो की पेन्शन बचावासंबंधीचे तुमचे एक पाऊल दुसर्या बांधवांच्या लढ्याला प्रेरणादायी,ऊर्जादायी  ठरणार आहे.
तालुका ,जिल्हा निहाय गट तयार झाले आहेत सर्वांमध्ये योग्य समन्वय साधूया, एकजूट दाखविता हे जमले तर आपले ध्येय निश्चितच अवघड नाही.

आतातरी घ्या टेंशन ।
आपला हक्क जुनी पेन्शन ।

धन्यवाद��

��पेन्शन बचाव कृतीसमिती पेठ��

No comments:

Post a Comment