जरा कंबर कसून सोबत चालता का? ज्ञानदेव नवसरे

🔸सरकारी कर्मचार्यांनो ,पेन्शनच्या लढ्यात जरा कंबर कसून सोबत चालता का?
                 📝 ज्ञानदेव नवसरे
नमस्कार मित्रांनो🙏

         जुनी पेन्शन योजना हा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुप जिव्हाळ्याचा विषय आहे कारण त्यात आपला फायदा आहे याउलट डी सी पी एस ही कर्मचाऱ्यांसाठी जीव घेणी योजना  दोघांच्या तुलनेत कर्मचार्यांना DCPS चा काहीच फायदा नाही.
       जुनी पेन्शन लागू करणारे अन DCPS लागू करणारे सरकार एकच अन आज कर्मचार्यांच्या मदतीला धावतो म्हणणारेही तेच किती विरोधाभास आहे पण वास्तव आहे .
      आपल्याला अमुक सरकार चांगले आणि तमुक सरकार चांगले याचा विचार न करता जुन्या पेन्शनच्या योजनेला मदत करणारे सरकार सोबत घ्यायचे आहे
मग ते सत्ताधारी असतील किंवा
विरोधक.
     सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात गुंतायचेच नाही
कारण
 दोघेही एकाच माळेचे मनी,
ते एकत्र बसून काम करतात, एकमेकांचे विरोधक असूनही त्यांच्यात सगळ काही ठीक असतं.
आपण मात्र त्यांच्या पासून दूर राहून काम करतो ,कर्मचार्यांचे डी सी पी एस सारखे जीवघेणे  शासन निर्णय काढताना दोघांमध्ये चर्चा होत असतेच की त्यावेळी विरोधक मात्र मूग गिळून गप्प बसतात.
    आपल्याला दोघांचाही  विचार करायचा नाही जोपर्यंत आपण सगळे बांधव संघटित होत नाहीत तोपर्यंत आपल्या लढ्यात कोणीही नकारात्मक वातावरण तयार होणार नाही याची दक्षता घेऊया।
शेवटी जे करायचे आहे ते शासन करतीलच की पण
आपण अगोदर हातपाय झाडीत बसलो तर लढ्याला उभा राहायचं कसं. आपल्या जुन्या पेन्शन योजनेच्या कायद्याच्या ध्येयाच्या शेवटच्या पाऊलापर्यंत  म्हणजे शासन निर्णय येण्यापर्यंत आपल्यात सकारात्मक वातावरण ठेवून लढा रेटत राहिले पाहिजे.
सकारात्मक वातावरण
आपल्या मनात ,लेखनीत अन कृतीतसुद्धा महत्त्वाचे आहे त्यासाठी
आपण एकमेकांचे मनोबल वाढवूयात,
आपण एकमेकांच्या सोबत आहोत,
आपले गटातील एखाद्याशी वैयक्तिक मतभेद असतील तर दूर करूयात,कारण हा लढा एकट्याचा नाही समूहाचा आहे .
पेन्शन लढ्याचा विषय हा  आपल्यातच चर्चेसाठी रंगवण्याचा विषय नाही तर लोकसभेत,विधानसभेत रंगवण्याचा विषय आहे . आपल्याला फक्त चर्चेच्या  रंगाचा डब्बा विधानसभेपर्यंत कसा जाईल याचा विचार करायचा आहे .
दोघेही
 सरकार आणि विरोधक आपोआप आपल्या जुनी पेन्शन योजनेच्या घराला रंग  देण्याचे काम करतील नव्हे त्यांना आपल्याला कामाला लावून द्यायचेच आणि त्यांना ते करावेच लागेल. मला खात्री आहे आपले पेन्शनचे घर पहिले होते तसे सरकार अन विरोधक दोघेही मिळून रंगवतील अशा आशावाद घेऊन प्रत्येकाला आपले प्रत्येक पाऊल उचलायचे आहे पण
ते तेव्हांच शक्य होईल जेव्हा संपूर्ण तालुका, संपूर्ण जिल्हा आणि संपूर्ण राज्यातील सरकारी कर्मचारी एकत्र येतील,सगळ्यांना घेऊन सोबत चालतील ,एकमेकांचे मनोबल वाढवतील ,आंदोलने करतील.
आपले संघटन हाच आपला विजय.
आपले सकारात्मक मनोबल हाच आपला विजय.
आपले एकमेकांना पाठबळ हाच आपला विजय.

पेन्शन बचाव ।। टेन्शन हटाव ।।

सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

http://dnyanvahak.blogspot.in/2015/09/blog-post_14.html?m=1

धन्यवाद🙏
वाचा 📙📘अणि वाचायला द्या➡➡

🔶पेन्शन बचाव कृतीसमिती,पेठ 🔷
          ता पेठ जि नाशिक

No comments:

Post a Comment