सर्व डिजिटल करा भाऊ , पन लागू करा जुनी पेन्शन - भरत पाटील नाशिक


नमस्कार शिक्षक मित्रांनो🙏
आज सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनचा वणवा पेटलाय .
सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात,ध्यानात,कृतीत अन लेखनीत
पेन्शनबद्दलचा टाहो फोडला जातोय.
शिक्षकांनी सरकारच्या dcps पेन्शन योजनेच्या विरोधात लेखनीचे हत्यार उचलले आहे नक्कीच कौतुकास्पद, आता क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही.

       मालेगाव तालुक्यातील तंत्रस्नेही कृतिशील शिक्षक श्री भरत पाटील सर यांची
''सर्व डिजिटल करा भाऊ
पण
लागू करा जुनी पेन्शन"

🙏🏻सर्व डिजीटल करा भाऊ,
पण लागू करा जूनी पेन्शन,

शाळा आम्ही पुढे आणतोच,
समद्या खास्त्या खातोच,
राबराब राबवतो समदं डोसकंच,
पण लागू करा जूनी पेन्शन.

जूनं नि नवं समदं खरं,
का सध्या बदललं वारं,
विचारतो तुम्हाला भाऊ रं,
लागू कर ना रं जूनी पेन्शन.

एकत्र आलोय सांगतो आता,
संघटन मनात कसल्या बाता,
आयुष्य अंधार पुढे रास्ता,
 लागू करा जूनी पेन्शन.

समदे सोबत म्हणतात भाऊ,
लबाडाचं जग वाटू रायलं,
फक्त पोळी भाजून घेतायत,
तरीपण लागू करा जूनी पेन्शन.

भरपूर शक्ती आहे तुझ्यात,
विश्वास ठेव स्वतःवर,
हक्कानं नि हक्काचं मागतोय,
लागू करा जूनी पेन्शन.

बैठक,विचार वाढ होणारचं,
आश्वासन गाजर भेटणारचं,
कृती आता आपण करणारचं,
तरीपण लागू करा जूनी पेन्शन .

dcps चा थांगपत्ता नाही,
कुटुंब वाय्रावर सोडणारं,
भविष्य सुरक्षित नसणारं,
समदा विचार करा पण एकच आचार द्या,
लागू करा जूनी पेन्शन.

डिजीटल मागे धावायला सांगा,
डिजीटल सारं करायला सांगा,
डिजीटल संघर्ष करून घेऊ ,
पण हक्कानं नि हक्काचं मागतोय,
नका घेऊ तुम्ही टेन्शन,
लागू करा आता जूनी पेन्शन!

👉🏻भरत विठ्ठल पाटील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीनगर ता.मालेगाव जि.नाशिक.


चला संघटीत होऊ या!
आपला हक्क मागू या!
जूनी पेन्शन,जूनी पेन्शन!

🌹मालेगाव पेन्शन कृती समिती🌹

No comments:

Post a Comment